परवाना विभागाच्यावतीने एस.टी. स्टॅंड परिसरातील नऊ दुकाने सील


कोल्हापूर • प्रतिनिधी  
     महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने शुक्रवारी जीवनावश्यक दुकाना व्यतिरिक्त सुरु असलेली नऊ दुकाने सील केली.
     कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करुन जीवनावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु केल्यास ती सील करण्याची कारवाई परवाना विभागामार्फत सुरु आहे. तरीही कोरोनाचे गांभीर्य न लक्षात घेता काही दुकानदारांनी आपला व्यवसाय चालू ठेवल्याचे निदर्शनास आले. यामुळे परवाना, अतिक्रमण व केएमटी विभागाच्या पथकाने एस.टी. स्टॅंड परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समधील महादेव मोबाईल शॉपी, हार्दिक ॲक्सेसरीज, राधेश्याम मोबाईल शॉपी, अवतार मोबाईल शॉपी, आनंद मोबाईल शॉपी, साई इलेक्ट्रॉनिक्स, महालक्ष्मी मोबाईल शॉपी, बालाजी मोबाईल शॉपी, तेजम मोबाईल शॉपी या नऊ दुकानांवर सीलबंद करण्याची कारवाई केली.
     तरी शहरातील सर्व व्यवसायधारकांनी कोविड-१९ च्या शासन निर्देशांचे पालन करुन कायदेशीर कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. सदरची कारवाई परवाना अधिक्षक रामचंद्र काटकर, अतिक्रमण विभागप्रमुख पंडीत पोवार, सुनिल जाधव व कर्मचारी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *