शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या वाढदिवसानिमित्य शववाहिका प्रदान


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला स्मशानभूमीमध्ये पोहोच करण्यासाठी शववाहिकेची व्यवस्था करणेत आली आहे. भवानी फौंडेशनच्यावतीने कोल्हापूर शहरात ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे.
      शववाहिका प्रदान करण्याच्या कार्यक्रम आज सीपीआर येथे पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे, हर्षल सुर्वे यांचे हस्ते ही शववाहिका सीपीआरचे अधिष्ठाता सत्यवान मोरे, सिव्हिल सर्जन डॉ. माळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
     यावेळी बोलताना संजय पवार यांनी सीपीआरसाठी २० व्हेंटलेटर ना. उदय सामंत यांचे हस्ते देणेत येणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आ. सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, जयाजी घोरपडे, मिथुन जाधव, बंटी सावंत, चैतन्य अष्टेकर, शरद चौगुले, प्रेम सातपुते आदी उपस्थित हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *