उद्यापासून आठदिवस एकदिवस आड पाणीपुरवठा

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिंगणापूर अशुध्द उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणीपुरवठा करणाऱ्या चार पंपापैकी दोन पंप बंद पडले आहेत. त्यापैकी एक पंप तातडीने दुरूस्त करण्यात येत आहे. तथापी सर्व चारही पंप सुरू होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील ए, बी आणि ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना शुक्रवार दि.१८ जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
     याबाबत  महापालिका पाणीपुरवठा विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील ए, बी आणि ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना कळविणेत येते की, शिंगणापूर अशुध्द उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणीपुरवठा करणाऱ्या चार पंपापैकी दोन पंप बंद पडले असून त्यापैकी एक पंप तातडीने दुरूस्त करण्यात येत आहे. तथापी सर्व चारही पंप सुरू होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने भागातील नळ कनेक्शनधारकांना शुक्रवार (दि.१८) पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
     नियोजनाप्रमाणे वरील भागापैकी ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागास दि.१८ आणि ए, बी वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामिण भागास दि.  १९ रोजी प्रमाणे एक दिवस आड पाणी पुरवठा होईल याची कृपया संबधितांनी नोंद घ्यावी.
              भागांची नावे 
    ए, बी वॉर्ड- पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ परिसर, शिवाजी पेठ परिसर, मंगेशकरनगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसायटी परिसर, कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर परिसर, बापुरामनगर परिसर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवले मळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स परिसर, राजीव गांधी परिसर, जरगनगर परिसर, गंजीमाळ, रामानंदनगर परिसर, नाळे कॉलनी परिसर, विजयनगर परिसर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी परिसर, वर्षानगर, भारतनगर परिसर, सुभाषनगर पंपींगवरील ग्रामीण भाग, पाचगाव परिसर, आर.के.नगर परिसर, पुईखडी परिसर, जिवबानाना परिसर, विशालनगर, आयसोलिएशन परिसर, वाय.पी.पोवारनगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी परिसर, पोस्टलकॉलनी परिसर, आर.के. नगर परिसर, जरगनगर ले आऊट,
    ई वॉर्ड राजारामपुरी वितरण – संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहू मिल परिसर, वैभव हौसिंग सोसायटी परिसर, ग्रीनपार्क परिसर, शांतीनिकेतन परिसर, रेव्हेन्यु कॉलनी परिसर, अरूणोदय परिसर, राजेंद्रनगर परिसर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर परिसर, प्रतिकानगर परिसर, इंगळेनगर परिसर, दौलतनगर परिसर उद्यमनगर परिसर, शास्त्रीनगर परिसर, पांजरपोळ परिसर,  नवश्या मारूती चौक परिसर, दत्तगल्ली परिसर, यादवनगर परिसर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर परिसर, पायमल वसाहत परिसर, अंबाई डीफेन्स प‍रिसर, राजाराम रायफल, काटकरमाळ इत्यादी.
     या भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याचे पाणी पुरवठा होण्याच्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
तरी या भागातील नळ कनेक्शनधारकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!