नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून साहस फाऊंडेशनला एक लाखांची मदत


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने साहस फाऊंडेशनला एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. मदतीचा धनादेश फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाऊंडेशनच्या संस्थापिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा हुरजूक यांच्याकडे दिला. यावेळी श्री. मुश्रीफ यांनी साहस फाऊंडेशनच्या सामाजिक व सेवाभावी कार्याची सविस्तर माहिती घेतली.
      यावेळी डॉ. नसीमा हुरजूक म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सामाजिक कार्याचा आलेख प्रचंड आहे.  त्यांचाच सामाजिक वारसा नवीद मुश्रीफ समर्थपणे पुढे चालवीत आहेत. अपंगांना रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर जगण्यासाठी सक्षम करणे, हे साहसचे मुख्य उद्दिष्ट आहे. फाउंडेशन व दिव्यांग निधीतून कोल्हापूर शहरासह मुंबई, पुणे, सातारा, सांगली या ठिकाणी दिव्यांगांसाठी सोयीस्कर वसतिगृहांची सोय करणार असल्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.
     नवीद मुश्रीफ म्हणाले, डॉ. नसीमा हुरजूक यांचे दिव्यांगाना सन्मानाने जगणे मिळवून देण्याचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या या महान कार्यात खारीचा वाटा म्हणून आपलेही थोडे योगदान असावे, या कर्तव्य भावनेने आमची ही मदत आहे.
     यावेळी साताराम पाटील, के. डी. पाटील, सौ. मधुताई पाटील, सौ. रंजना पाटील आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *