डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने कस्तुरी सावेकरला एक लाखांची मदत


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापुरातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहिका कस्तुरी सावेकर ही सध्या एव्हरेस्ट शिखर मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. मोहिमेसाठी येणारा खर्च लक्षात घेता, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतूराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील  दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश दिला.
      कस्तुरी सावेकर ही सध्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेच्या अंतीम टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी अंदाजे ४२ लाख रुपयांचा खर्च असून, ही मोहीम पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन सावेकर कुटूंबियांकडून करण्यात आले होते. कोल्हापुरच्या या रणरागिणीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने पुढाकार घेत, आमदार ऋतूराज पाटील यांनी कस्तुरीचे वडील दिपक सावेकर, भाऊ अमित यांचेकडे मंगळवारी एक लाख रूपयांचा धनादेश दिला.
     जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकावत कस्तुरी कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहचवेल, असा विश्वास व्यक्त करत आमदार ऋतुराज पाटील यांनी कस्तुरीला शुभेच्छा दिल्या. तर डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने करण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे कस्तुरीच्या मोहीमेसाठी मोठं बळ मिळाल्याची भावना व्यक्त करत, वडील दिपक सावेकर यांनी डी. वाय. पाटील ग्रुपचे आभार मानले.
     यावेळी कोल्हापूर जिल्हा माऊंटेनरींग असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. विश्वनाथ भोसले, जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, प्राचार्य डॉ.महादेव नरके उपस्थित होते.
———————————————– Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *