कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या शाहूपुरी येथील केंद्र कार्यालयायामध्येच ऑनलाइन पद्धतीने ही सभा होणार आहे. दुपारी एक वाजता ही सभा सुरू होणार आहे.
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला.
यावेळी संचालक मंडळातील आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, माजी खा. श्रीमती निवेदिता माने, सर्जेराव पाटील-पेरीडकर, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, अशोकराव चराटी, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील आदी सदस्य तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.