• १० लाखापर्यंत कर्ज मर्यादा बहुमताने मंजुर
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या आदेशानुसार दि.११ मार्च २०२१ रोजी गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा ७ लाखावरून १० लाख करणेस मंजुरी देण्यात आली.
संस्थेची वार्षिक उलाढाल १०० कोटीच्यावर असून ठेवीस ८ टक्के व्याज तर कर्जास ९ टक्के व्याज दर आकारला जातो. या सभेस १३० सभासदानी लिंक ओपन करून चर्चेत सहभाग घेतला. संस्थेचे सभासद संभाजी कदम, रामकृष्ण पाटील, प्रकाश माने, सुहास डोंगळे, अनिल पाटील, गिता मोरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
संस्थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, सतिश मदने, पी. आर. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सभा दिडतास खेळीमेळीत चालली. आभार पी. आर. पाटील यांनी मानले.
यावेळी सभेस संभाजी देसाई, शिवाजी पाटील, नंदकुमार गुरव, सुनिल घाटगे, शुभदा पाटील, छाया बेलेकर, राजेंद्र पाटील-सरूडकर, गणपती कागनकर, व्यवस्थापक संभाजी माळकर उपस्थित होते