घोडावत पॉलीटेक्निकमार्फत १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन

• ११ जून रोजी करिअर मार्गदर्शन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन करिअर मार्गदर्शन दि.११ जून रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केले आहे.
     सध्या विद्यार्थी पालक एका फार मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत की, १०/१२ वी नंतर पुढे काय करायचे? कोणत्या शाखेस प्रवेश घ्यायचा? करिअर कसे निवडावे? करिअर निवडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालक शोधत आहेत. अशा परिस्थितीत तज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थ्याला करिअर निवडणे अगदी सोपे जाऊ शकते म्हणूनच या एक दिवसीय ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला आहे.
यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी हे लाभले आहेत. ते १० वी व १२ वी नंतरच्या करिअरच्या वाटा याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त संजय कृ. माळी व घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा. अजय कोंगे हे लाभले आहेत.
      या कार्यक्रमासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *