बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षकांना पदवी व प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेमार्फत बुद्धिबळ खेळाडूंना व प्रशिक्षकांना प्रशिक्षकाची पदवी व प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे आयोजन केले आहे.
     या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व तळागाळात दर्जेदार खेळाडू निर्माण करून बुद्धिबळाचा विकास व प्रसार करण्याचा उद्देश आहे. या प्रशिक्षण उपक्रमामध्ये बिगर गुणांकनप्राप्त सहभागी बुद्धिबळ खेळाडूसाठी पाच दिवस (२५-३० तास प्रशिक्षण) व गुणांकनप्राप्त सहभागी बुद्धिबळ खेळाडूसाठी तीन दिवस (१५ तास प्रशिक्षण) आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुणांकनप्राप्त बुद्धिबळ खेळाडूसाठी १००० रूपये व बिगर गुणांकनप्राप्त बुद्धिबळ खेळाडूसाठी १५०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
     या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीनी व प्रशिक्षकांनी बुद्धिबळाच्या विकासासाठी चेस इन स्कूल उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील तळागळातील शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या उपक्रमात सहभागी व्हावे.
सदर बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुकांनी आपली नावे ४ मार्चपर्यंत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या ई-मेलवर maharashtrachessassociation@gmail.com प्रवेशिका भरून नोंदवावी.
     अधिक माहितीसाठी विलास म्हात्रे (मो.नं.८८८८०११४११), भरत चौगुले (मो.नं.९८५०६५३१६०), प्रवीण ठाकरे (मो.नं.९२२६३७५०७७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोकभाऊ जैन, अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी  केलेआहे.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!