राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा

Spread the love

• संजय घोडावत विद्यापीठामार्फत आयोजन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्या एनएसएस व स्कुल ऑफ लिबरल आर्टस् विभागाच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
     निबंध स्पर्धा तीन गटात घेतली जाणार असून पहिला गट हा इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून त्यांना ”शाहू महाराज जीवन व कार्य” हा विषय आहे व त्यासाठी शब्दमर्यादा १००० शब्द आहे. दुसरा गट हा कनिष्ठ महाविद्यालयीन व डिप्लोमाच्या  विद्यार्थ्यांसाठी असून त्यांना ”शाहू महाराजांचे शैक्षणिक योगदान” हा विषय आहे व त्यासाठी शब्दमर्यादा २००० शब्द आहे. तिसरा गट हा पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असून त्यांना ”शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा” हा विषय आहे व त्यासाठी शब्दमर्यादा ३००० शब्द आहे.
निबंधाची भाषा मराठी असून कोणताही वादग्रस्त, आक्षेपार्ह मजकूर लिहू नये तसेच हा निबंध हस्तलिखित स्वरूपात लिहून स्कॅन करून pujari.bb@sginstitute.in  या मेल आयडीवर २० जूनपर्यंत पाठवावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
     या निबंध स्पर्धेमधून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला जाणार असून यासाठी २० हजार रुपयांची रोख बक्षिसे तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा.बसवराज पुजारी व स्कुल ऑफ लिबरल आर्ट्सचे डीन डॉ. उत्तम जाधव व टीम अथक परिश्रम घेत आहेत.
    या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू व अकॅडमिक डीन डॉ.एम.टी तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ.एन.के.पाटील व  संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!