कोल्हापूर • प्रतिनिधी
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी येथे भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली प्रशिक्षण आणि शिक्षण अटल या प्रकल्पांतर्गत भारतातील फार्मसी व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक व पदवयुतर विद्यार्थ्यांच्यासाठी एक्स्प्लोरिंग फार्मकायनेटिक विथ आर्टिफिशल इंटेलिजन्स अॅण्ड कम्प्युटिंग या विषयावर कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम डॉ.वंदना पत्रावळे, प्राचार्य डॉ. एच.एन. मोरे व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. एम. एस. भाटिया यांच्या उपस्थित संपन्न झाला.
सदर कार्यक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण दिल्ली यांच्या अटल अकादमी पुरस्कृत केला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे मार्गदर्शनपर भाषण झाले. या कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे २०० शिक्षक व व संशोधक सहभागी झाले होते.
कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत मुरूमकर, डॉ. कुंदन इंगळे, डॉ. भाऊसाहेब पाटील, डॉ. पूजा जैन, डॉ. संतोष पाटील, डॉ.सुवर्णा राय, डॉ. अजय पिलाई, डॉ. गणेश व्ही., डॉ.सामी मुखोपाध्याय, डॉ.अनिल देशपांडे, डॉ. पिसुर्लेकर, डॉ. सुभाष जगताप,डॉ. अनिल देशपांडे, डॉ. सुभाष आजमानी, सचिन जगताप तसेच डॉ.वंदना पत्रावळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे डॉ. एम.एस.भाटिया हे मुख्य समन्वयक तर प्रा.व्ही. टी. पवार यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन सोनाली निरंकारी, स्नेहा रोचलानी तर आभार व्ही. टी. पवार यांनी मानले.