ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र परीक्षा

Spread the love

• राज्यस्तरीय पंचांसाठी ऑनलाईन रिफ्रेशर कॅम्प
कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने मे महिन्यात दि.१५-१६, २२-२३ आणि २९-३० या शनिवार-रविवारी दोन दिवसांचे (रोज आठ तास प्रशिक्षण) ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंचाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व नंतर ६ जून रोजी परीक्षा घेऊन वर्गवारी करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
      त्याचबरोबर २०१२ पासून सध्या अस्तित्त्वात असलेल्या सर्व राज्यस्तरीय बुद्धिबळ पंचाना ज्ञान अद्ययावत करण्यासाठी दोन दिवसाचे (रोज सहा तास प्रशिक्षण) रिफ्रेशर वर्कशॉप आयोजित केले आहे. त्यांचीही ६ जून रोजी परीक्षा घेऊन वर्गवारी करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. रिफ्रेशर वर्कशॉप करणाऱ्या व नवीन झालेल्या राज्यस्तरीय पंचानाच वर्गवारीनुसार तालुका/जिल्हा/राज्य/राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी मिळू शकेल. 
      तालुका व जिल्हा पातळीवर जास्तीत जास्त सक्षम पंच निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण व परीक्षा मराठी/इंग्लिश या दोन्ही माध्यमातून होईल. प्रशिक्षण झाल्यावर परीक्षेसाठी सर्वांना स्टडी मटेरियल दिले जाणार आहे. त्याचबरोबर बॅचनुसार व्हाट्सअप ग्रुप तयार केला जाईल, यामध्ये अधिक माहिती व शंकानिरसन केले जाईल.
महाराष्ट्रातील तज्ञ आंतरराष्ट्रीय व फिडे पंचाकडून सर्वांना प्रशिक्षण/मार्गदर्शन  मिळणार आहे.
      इच्छुकांनी प्रवेश फॉर्म व शुल्क सह आपली नांवे १२ मे पर्यंत खालील लिंकवर रजिस्टर करावीत.
MCA State Arbiter Camp & Refresher Course Registration Links :
  1) For State Arbiter Refresher Camp:
maharashtrachess.org/refresher_registration
  2) For State Arbiter Camp :
http://maharashtrachess.org/certification_registration
     अधिक माहितीसाठी भरत चौगुले (मो.नं. ९८५०६५३१६०) व विलास म्हात्रे (मो.नं. ८८८८०११४११ 8888) यांच्याशी संपर्क साधावा.
      महाराष्ट्र राज्यातील बुद्धिबळ स्पर्धांमधील व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी या संधीचा जास्तीत जास्त बुद्धिबळप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांनी केले आहे.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!