संजय घोडावत रेसिडेन्शल अकॅडमीमार्फत स्पर्धा परीक्षेवर ऑनलाईन वेबिनार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्यावतीने संजय घोडावत रेसिडेन्शल अकॅडमीची निर्मितीकरून महाराष्ट्रात प्रथमच पदवीसोबत संपूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडविण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम २०२१-२२ मध्ये सुरु केला आहे. या अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना घरबसल्या  विविध स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी म्हणून दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता ऑनलाईन वेबिनार आयोजित केला आहे. या वेबिनारसाठी भरत साबळे व पोरस राजपुरोहित हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तरी इच्छुकांनी ९५४५३६१६१८ या क्रमांकावर संपर्क करून नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
     या अकॅडमीमार्फत पदवीमध्ये असणाऱ्या कोर्समध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी व बीबीए इत्यादी कोर्सची उपलब्धता आहे. तसेच पदवीबरोबर स्पर्धापरीक्षामध्ये एमपीएससी राज्यसेवा परीक्षा संयुक्त गट ब व क तसेच सरळसेवा परीक्षांची तयारी व बँकिंग परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा, रेल्वे व इन्शुरन्स इत्यादी सर्व परीक्षांची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे.
पदवी स्पर्धापरीक्षांबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे कोर्सेस व कौशल्यामध्ये अधिकारी बनविण्यासाठी टायपिंग कोर्स, संगणक, संभाषण, मुलाखत कौशल्य तसेच शारीरिक विकास होणारे खेळ व शैक्षणिक सहल व इतर सर्वकाही एकाच ठिकाणी देणारा परिपूर्ण निवासी उपक्रम विद्यापीठाच्यावतीने राबविला जाणार आहे.
      या वेबिनारसाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 
===========================

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!