डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात उद्या ऑनलाईन कार्यशाळा

Spread the love

• स्पर्धा परीक्षा व उद्योजकीय विकास  विषयावर कार्यशाळा
कोल्हापूर • प्रतिनिधी
     माणूस ही जात व माणुसकी हा धर्म मानून आयुष्यभर निस्वार्थीपणे लोककल्याणाचे कार्य करणारे भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार जपणाऱ्या भारती विद्यापीठाने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आम्ही भारतीय मोहिमे अंतर्गत स्पर्धा परीक्षा व उद्योजकीय विकास या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा गुरुवारी (दि.२६)  दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत होत असल्याचे शिवाजी विद्यापीठ व्यस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी सांगितले आहे.
     सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यलय व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा व उद्योजकीय विकास याच्या जाणीव जागृतीसाठी ही ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे.
     कोल्हापूर येथील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे व प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा यू-ट्यूब लाईव्ह असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी पदवी उत्तीर्ण व कार्यरत विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कार्यशाळेचे समन्वयक व जागर करिअर कट्टा सांगली जिल्हा उच्च शिक्षण विभाग समन्वयक डॉ. डी. पी. नाडे (मो.नं.९५५२६७८५६३)यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!