यापुढे मादी वासरेच जन्माला येणार: अरुण डोंगळे


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कृत्रिम रेतनाद्वारे जास्तीत जास्त मादी वासरेच जन्मास येऊन दूध उत्पादन वाढावे व दूध उत्पादकास आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील अशा  लिंगविनिश्चित वीर्यामात्रा १८१ रुपये इतक्या नाममात्र किमतीत उपलब्ध करण्यात येणार आहेत.
     गोकुळमार्फत मादी वासरेच जन्मास येतील अशा  लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा उपलब्ध करणेत आल्या होत्या पण किंमत जास्त असल्याने दूध उत्पादकाकडून त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशा  लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा नाममात्र किंमतीत शासनाकून उपलब्ध व्हाव्यात यासाठी गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दुग्ध विकासमंत्री सुनील केदार तसेच पशुसंवर्धन आयुक्त यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यास यश आले. या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या गोठ्यात जातीवंत दुधाळ जनावरांची पैदास वाढणार असून दूध उत्पादनातही वाढ होणार आहे. निसर्ग नियमानुसार जनावरामध्ये ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरे जन्मास येतात सध्या अशा लिंगविनिश्चित केलेल्या विर्यमात्रांची बाजारातील सरासरी किंमत १००० ते १३०० रुपये इतकी आहे. 
     महाराष्ट्र राज्यात ४ मार्च २०१५ पासून संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करणेत आलेला आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झालेने शेतीकामासाठी बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या नर वासरांचे संगोपन करणेसाठी दूध उत्पादकांना अनावश्यक खर्च सोसावा लागत होता. तसेच नर वासरांचे  संगोपन करावे लागल्याने दुधाळ जनावरांना चार कमी पडतो परिणामी अनुवांशिक क्षमता असुनहि त्यांच्या दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यापुढे पारंपारिक विर्यामात्रा ऐवजी लिंगविनिश्चित वीर्यामात्रा निर्मिती या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या विर्यामात्रांचा गाई-म्हशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केलेस त्यापासून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. 
     महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत  सदरच्या  लिंगविनिश्चित केलेल्या  वीर्यामात्रा उत्पादन व पुरवठा करण्याचे  काम Genus Genus Breeding India Pvt. Ltd. (ABS India) या संस्थेला देण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून शासन निर्णयानुसार केंद्र सहाय्यित (६०:४०) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत हा कार्यक्रम सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
     वरील लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा राज्यातील सहकारी / खाजगी दूध संघांना त्यांच्या दुध उत्पादकाकडील जनावरांना कृत्रिम रेतन करणेसाठी मागणीप्रमाणे १८१ रुपये प्रति वीर्यमात्रा या दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापैकी दूध संघ आपले १०० रुपये घालणार असून सदरची लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा दूध उत्पादकांना प्रति विर्यामात्रा ८१ रुपये या दराने उपलब्ध होणार आहेत. या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा गोकुळ दुध संघामार्फत लवकरच उपलब्ध होतील असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.
———————————————–
 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *