गोकुळच्‍या गोगवे शितकरण केंद्राच्‍या रेफ्रिजेशन प्‍लॅान्‍टचे उद्धाटन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या गोगवे शितकरण केंद्राच्‍या नवीन अद्यावत अशा उभारलेल्‍या २ लाख लिटर क्षमतेच्‍या रेफ्रिजेशन प्‍लॅान्‍टचे उद्धाटन संघाचे चेअरमन विश्‍वासराव नारायण पाटील (आबाजी) यांच्या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच वाढीव विद्युत लोडच्‍या ट्रान्‍सफॉर्मरचे व क्‍युबीकल मिटरींग रूमचे उद्धाटन संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या हस्‍ते कण्‍यात आले.
      याप्रसंगी चेअरमन विश्वासराव पाटील म्‍हणाले, सध्‍या चिलिंग सेंटरकडे दररोज १ लाख लिटर दूधाचे संकलन होत असून पुढील काळात दूध संकलन दोन लाख लिटरपर्यंत वाढविण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे.
      प्रास्ताविक शाखाप्रमुख सुधाकर पाटील यांनी केले. आभार दिलीप गवळी यांनी मानले.
       यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, गोगवे शाखाप्रमुख सुनील पाटील तसेच चिलिंग सेंटरकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *