• बिझनेस कोचसह वैशिष्ट्यपूर्ण दुबई टूर करण्याची संधी कोल्हापूर • प्रतिनिधी सार्या जगाचे लक्ष वेधून घेणार्या ‘दुबई एक्स्पो’ प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यावसायिकांना दुबईमध्ये होऊ घातलेल्या ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्स’मध्ये सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील प्रसिध्द ब्रिजमोहन टुरिझमने बिझनेस कोचसह स्पेशल दुबई टूरचे आयोजन केले असल्याची माहिती बिझनेस कोच अतुल ठाकूर व ब्रिजमोहन टुरिझमचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जगदीश कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते. ब्रिजमोहन चौधरी म्हणाले की, १२ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ‘दुबई एस्न्पो’च्या माध्यमातून ‘गल्फ फूड फेअर’ या महत्त्वाच्या खाद्य-पेय आणि कृषी संदर्भातील प्रदर्शनाला भेट देता येईल आणि महाराष्ट्रीयन व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या अशा ‘महाबीज बिझनेस कॉन्फरन्सला’ उपस्थिती लावता येईल. तसेच गरजेप्रमाणे दोन दिवसाची ‘दुबई लोकल व्हिजीट’ची टूरही करता येईल. या टूरचे विशेष म्हणजे या संपूर्ण दौर्यात आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बिझनेस कोच अतुल ठाकुर व त्यांची टीम राहणार असून व्यावसायिक संधी व नेटवर्किंग यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढावा यासाठी या दुबई दौर्यात उद्योजकांना सातत्याने मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जीएमबीएफ ग्लोबल ही आखाती देशातील विविध क्षेत्रातील महाराष्ट्राशी निगडित असलेल्या उद्योजक व व्यावसायिकांनी स्थापन केलेली प्रसिद्ध व विश्वासार्ह अशी अग्रगण्य संस्था आहे. १५ पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेल्या या संस्थेचे ५०० पेक्षा जास्त सभासद आखाती , मध्य पूर्व, आफ्रिकन देशात आहेत. जीएमबीएफ ग्लोबलच्या सातत्याने केलेल्या कार्यामुळे आज महाराष्ट्रातील अनेक उद्योजक व व्यावसायिक यांच्या उत्पादनांना व सेवांना जागतिक बाजारपेठ मिळाली आहे. १८ व १९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाबिझचे आयोजन करण्यात आले असून नाशिकची ब्रिजमोहन टुरिझम ट्रॅव्हल पार्टनर म्हणून काम बघत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसिध्द बिझनेस कोच लाईफ कॅटलिस्ट प्रा.लि.चे सीईओ अतुल ठाकूर म्हणाले की, गाइडेड बिझनेस टूरचे फायदे असे असतात, ज्यामध्ये टूरपूर्वी आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रेझेंटेशन कसे असावे यावर मार्गदर्शन केले जाते. दुबईमध्ये तीन तासांचे सेशन, ज्यामध्ये दुबईस्थित व्यवसायिकांचे मार्गदर्शन, संपूर्ण टूर दरम्यान रोज zoom वर ट्रेनिंग, महाराष्ट्रीय व्यावसायिक हा आपल्याला लोकांसोबत comfirtable असतो तिथे महाराष्ट्रीयन व्यवसायिकांशी नेटवर्किंग व व्यवसायाची संधी त्याचप्रमाणे नेमक्या पद्धतीने कॅम्युनिकेशन कसे करावे याविषयी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गल्फ फ्रुड फेअर-दुबई एक्स्पो आणि महाबिज कॉन्फरन्ससोबत बिझनेस कोच असलेली ही टूर चार रात्री आणि पाच दिवस असणार आहे. पाच दिवसांमध्ये मुंबई टू मुंबई ६० हजार + जीएसटी व महाबिज कॉन्फरन्ससाठी रजिस्ट्रेशन फी १२ हजार असा असणार आहे. यामध्ये दुबई सिटी टूर, दाऊ क्रुज आणि डेझर्ट सफारी समाविष्ट असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अधिक माहितीसाठी ९४२२२७२००२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ——————————————————- Attachments areaReplyForward