खुल्या जागा व इमारतींना मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी कॅम्पचे आयोजन

Spread the love

• महापालिकेच्यावतीने १३ ते १६ डिसेंबरला  विशेष कॅम्प
कोल्हापूर • प्रतिनिधी
      ए.बी.सी.डी. व ई वॉर्डमधील खुल्या जागा व इमारतींना मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विभागीय कार्यालय वाईज १३ ते १६ डिसेंबर २०२१ या कालावधीत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
     या कॅम्पमध्ये ज्या मिळकतीवर (इमारतीवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही किंवा ज्या मिळकतीवर (इमारतींवर) अद्याप मिळकतधारकांनी मालमत्ताकराची आकारणी करून घेतलेली नाही अशा मिळकतधारकांना याचा लाभ घेता येणार आहे.
      महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कराधान नियम ८ कलम ५ (१) नुसार सदरची कर आकारणी करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी कर आकारणी करण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड, सातबारा उतारा, इंडेक्स उतारा, सेलडीड, कब्जेपट्टी, झोपडपट्टी कार्ड, बांधकाम परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, प्रथम लाईट बिल, अपार्टमेंट असलेस बिल्डर, डेव्हलपर यांचे पूर्ण नांव व पत्ता याबाबतची कागदपत्रे घेऊन यावीत. ज्या मिळकतींना यापूर्वी कराचे देयक येत होते परंतु आता येत नाही अशा मिळकतधारकांनी देयकाची छायाकिंत प्रत व कर भरणा केलेल्या पावतीची छायाकिंत प्रत अर्जासोबत सादर करावीत असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
      सदरचा कॅम्प गांधी मैदान विभागीय कार्यालय अंतर्गत १३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत गांधी मैदान येथील घरफाळा कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत १४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी मार्केट येथील घरफाळा कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राजारामपुरी येथील घरफाळा कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत १६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत छत्रपती ताराराणी मार्केट येथील घरफाळा कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!