कांकायन आयुर्वेद चिकित्सालयच्यावतीने सोरियासिस उपचार शिबिराचे आयोजन

Spread the love

• १७ ऑगस्टपासून दर मंगळवारी उपचार शिबीर
कोल्हापूर • प्रतिनिधी
     व्हीनस कॉर्नर येथील कांकायन आयुर्वेद चिकित्सालयच्यावतीने सोरियासिस उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रुग्णांकरिता दि.१७ ऑगस्ट २०२१ पासून  दर मंगळवारी सोरियासिस उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये सोरियासिसच्या रुग्णांना सोरायसिसचा काढा मोफत देण्यात येणार आहे. तरी याचा लाभ सोरियासिसच्या रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.सौ.वहिदा तांबोळी यांनी केले आहे.
     ऑगस्ट महिना हा राष्ट्रीय सोरियासिस  जागरुकता महिना (Psoriasis awareness month) म्हणून साजरा केला जातो. दिवसेंदिवस संपूर्ण जगात सोरियासिसचे पेशंट वाढत चालले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. सोरियासिस हा त्वचेचा आजार आहे, तरीसुद्धा जर तो लवकर आटोक्यात आला नाही तर सांधेदुखी म्हणजेच Psoriatic Arthritis, डोळ्यांचे आजार, डिप्रेशन, पार्किन्सन्स डिसीज, उच्चरक्तदाब, हृदयविकार मेटॅबोलिक सिंड्रोम हे आजार होण्याची शक्यता असते. हा आजार होऊच नये याकरिता जनजागृतीची गरज आहे.
     बदललेल्या जीवनशैलीमध्ये आंबवलेले इडली – डोसा सारखे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट व खारवलेले सुके पदार्थ उदाहरणार्थ वेफर्ससारखे पदार्थ, मसाल्यांचे प्रमाण खाण्यामध्ये वाढलेले आहेत. हे सर्व पदार्थ त्वचाविकार वाढवण्यास मदत करतात. या सर्व गोष्टींची सोरियासिसच्या लोकांना माहिती व्हावी आणि हा आजार होऊच नये, याकरीता लोकांनी प्रयत्न करावा म्हणून जनजागृतीची गरज आहे. याकरिता कांकायन आयुर्वेद चिकित्सालयच्यावतीने   सोरियासिसच्या रुग्णाकरिता सोरियासिस उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
     हे शिबीर दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कांकायन आयुर्वेद चिकित्सालय, पेंढारकर कॉम्प्लेक्स, व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी मो.नं. ८४८५००९९५१ आणि ९३२२७०६४७० संपर्क साधावा.
———————————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!