• सिनेकलावंत सचिन खेडेकर व प्राजक्ता माळी उपस्थित राहणार
कोल्हापूर • प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजय घोडावत यांचा सोमवारी (दि.२८) ५७ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथे संपन्न होणाऱ्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते सचिन खेडेकर व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती आहे. यावेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या ”उमंग” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
संजय घोडावत विद्यापीठाकडून अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ”एसजीयु आयकॉन” हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी साहित्य क्षेत्रातून सोनाली नवांगुळ, क्रीडा क्षेत्रातून अनुजा पाटील, उद्योग क्षेत्रातून दादू सलगर, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातून प्रकाश गाताडे, सामाजिक सेवा क्षेत्रातून संदीप परब यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि.२८) होणार आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील व संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांची उपस्थिती आहे.