कोल्हापूर • प्रतिनिधी
संयुक्त उत्तरेश्वर पेठ – शुक्रवार पेठ शिवसेना शाखेच्यावतीने पंचगंगा लसीकरण केंद्र येथील आशावर्कर कर्मचाऱ्यांना ऑक्सीमीटर, हॅण्डग्लोज व मास्क प्रदान करण्यात आले.
पंचगंगा लसीकरण केंद्रातील कर्मचारी लसीकरणाचे काम करण्याबरोबर घरोघरी स्वॅब घेणे, ऑक्सीमीटरने तपासणी करणे अशी कामे करतात. या लसीकरण केंद्रात काही साहित्यांची कमतरता आहे असे निदर्शनास आल्यानंतर संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष किशोर घाटगे, रियाज बागवान, सुरेश कदम, संजय देसाई, सनी अतिग्रे, राकेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीमिटर, हॅणडग्लोज व मास्क आदी साहित्य लसीकरण केंद्राच्या प्रमुख डॉ. सौ. रुपाली यादव व आशावर्कर्सकडे प्रदान करण्यात आले.
यावेळी अनंत पाटील, सुरज धनवडे, रईस बागवान आदीसह आशावर्कर्स व लसीकरण केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते