कोल्हापूर ‘दक्षिण’साठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशनमधील रुग्णांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५१ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत . 
     कोल्हापूर  दक्षिण मतदासंघासाठी असलेली ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे. अजिंक्यतारा कार्यालयमध्ये हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  ७ जूनपासून उपलब्ध आहेत.
     कोरोनाच्या संकटकाळामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील हे सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना सेवा देत आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे तसेच तुटवडा असताना अत्यंत गरज असणाऱ्या रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य वैद्यकीय मदतसुद्धा करत आहेत.
     सध्या सौम्य लक्षण असणारे अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये  डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घेत आहेत. काहीवेळा या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते .त्यावेळी हे  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपयुक्त आहेत.  त्याचबरोबर कोरोना उपचार घेऊन घरी गेलेल्या काही रुग्णांना दमा यासारख्या आजारामुळे काही दिवस   ऑक्सिजन द्यावा लागतो.
     या गोष्टी लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बँक तयार केली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची
गरज असेल त्यांच्या नातेवाईकानी  यासंदर्भात डॉक्टरांचे पत्र, रुग्णाचे आधार कार्ड आणि वापराबाबतचे एक हमीपत्र या गोष्टी देऊन हे मशीन  घेऊन जायचे आहे. या बरोबरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कसा वापरावा यासंदर्भात मार्गदर्शन करणारा व्हिडिओसुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत सहजपणे आणि आवश्यकतेनुसार घरी हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरता येणार आहे.
—————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *