कोल्हापूर • प्रतिनिधी
दहावी बारावी पास-नापास मुला मुलींकरिता तसेच सेवाभावी वृत्ती व आयुर्वेदाबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तीला कांकायन फाऊंडेशन व कांकायन आयुर्वेद चिकित्सालयातर्फे पंचकर्म सहाय्यक सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला आहे.
या कोर्समध्ये पंचकर्म उपचार करण्याची पद्धत शिकवली जाणार आहे. तसेच पंचकर्म करताना कोणती काळजी घ्यावी. पंचकर्मे काळजीपूर्वक न केल्यास होणारे दुष्परिणाम कोणते आहेत.या सर्व गोष्टी शिकवल्या जाणार आहे.
या कोर्समध्ये शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतः करण्याची संधी दिली जाणार आहे. हा कोर्सचा कालावधी ९ महिन्यांचा आहे. १५ मार्च ते 15 सप्टेंबर 2022 असे ६ महिने थेअरी व प्रॅक्टिकल आणि १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर 2022 असे 3 महिने इंटर्नशिप आहे.
कोर्सचे फायदे…..
• आयुर्वेद दवाखाना, हॉस्पिटल तसेच आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरीची संधी.
• उत्तम पंचकर्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी.
या कोर्ससाठी मर्यादित जागा आहेत. कोर्स संबंधीत अधिक माहितीकरिता
कांकायन आयुर्वेद चिकित्सालय, पेंढारकर कॉम्प्लेक्स पहिला मजला, व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर. मोबाईल नंबर ८४८५००९०५१ याठिकाणी संपर्क साधावा.