भाजपा कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     एकात्ममानवतावाद व अंत्योदय या विचारांचे प्रणेते, प्रखर राष्ट्रभक्त स्व.पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्य भाजपा जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पंडीतजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच समर्पण पेटीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आपले समर्पण जमा केले.
     भाजपा जिल्हा कार्यालयात प.म.देव्स्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी आमदार अमल महाडीक यांनी प्रविण दरेकर यांचे  स्वागत केले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारत देश आणि भारतीयांच्या उन्नतीसाठी मार्ग दाखविला. पंडीतजींच्या या अंत्योदयातील कल्पनेने प्रेरित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील एनडीए सरकार आणि सर्व राज्यांतील सरकारे असलेल्या भाजपा सरकार अंत्योदयच्या मार्गाकडे वाटचाल करत असल्याचे नमुद केले. दीनदयाळजी आणि त्यांची आर्थिक धोरणे नेहमीच गरिबांच्या हितावर भर देण्याविषयी सांगतात. 
      भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले, एकात्ममानवतावाद आणि अंत्योदय यांचे तत्वज्ञान हे पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक आहे. पं.दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले सारे जीवन संघटनेसाठी व राष्ट्रासाठी समर्पित केले. सिव्हिल सर्विसची परीक्षा पास होऊनदेखिल त्यांनी संघटनेसाठी त्या पदाचा त्याग केला.
     प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजपा हा पार्टी विथ डिफरन्स असा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या थोर व्यक्तींमुळेच भाजपा हा पक्ष घडला आहे. आजच्या कार्यकर्त्यांनी पंडितजींच्या समर्पित जीवनाचा आदर्श घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त समर्पण भारतीय जनता पार्टीसाठी करण्याचे आवाहन केले.
     यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, विजय अग्रवाल, किशोरी स्वामी, सचिन तोडकर, संजय सावंत, राजू मोरे, चिटणीस प्रमोदिनी हार्डिकर, दिग्विजय कालेकर, संदीप कुंभार, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, भरत काळे, डॉ. सदानंद राजवर्धन, अजित ठाणेकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, विवेक वोरा, दिलीप बोंद्रे, विशाल शिराळकर, सुधीर देसाई, जाधव, अमित शिंदे, रोहित कारंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!