पारळे क्रिकेट ॲकॅडमीची विजयी सलामी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत श्री. विठ्ठल पारळे किक्रेट ॲकॅडमीने करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन क संघावर करून विजयी सलामी दिली. सामन्यात विश्वजीत नागोसेने ८४ धावा करत एक बळी मिळवत अष्टपैलू कामगिरी केली.
     राजाराम काँलेज मैदान येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने टी-२० क गट क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाघाटन स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सेक्रेटरी केदार गयावळ, स्पर्धा कमिटी अध्यक्ष जनार्दन यादव, कॄष्णा धोत्रे, रोहन भुर्इंबर, सतिश लोंढे, नंदकुमार बामणे, नितीन पाटील, किरण रावण, विठ्ठल पारळे, पंच, स्कोरर व खेळाडू उपस्थित होते.
      प्रथम फलदांजी करताना करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन क संघाने २० षटकांत ८ बाद १४६ धावा केल्या. यामध्ये आर्यन देसार्इ ३५, अब्दुलमतीन शेख २०, आर्य खांडेकर १९, ओम मोहीते १९, अनुराग मेस्त्री १७ व नितेश केंबानी ११ धावा केल्या. श्री.विठ्ठल पारळे क्रिकेट ॲकॅडमीकडून  सिध्देश जाधवने २ तर अभिजीत कदम, सोहेल नदाफ, विश्वजीत नागोसे व आदित्य भोसले यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
    उत्तरादाखल खेळताना श्री. विठ्ठल पारळे क्रिकेट ॲकॅडमीने १८.५ षटकांत ८ बाद १४७ धावा केल्या. यामध्ये विश्वजीत नागोसे ८४, अर्जुन पाटील १५, पृथ्वी पुरोहीत १२ व सिध्देश जाधव ११ धावा केल्या. करवीर तालुका क्रिकेट असोसिएशन क कडुन अब्दुलमतीन  शेखने २ तर अव्दैत कुलकर्णी, आर्य खांडेकर व रोशन पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *