मताधिकार बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा: राहुल रेखावार यांचे आवाहन

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १२ एप्रिल २०२२ रोजी होत असून मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून मतदारांनी आपला मताधिकार बजावून या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
       एक सुदृढ लोकशाही बनवण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे. कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची आजवरची आकडेवारी पाहता पूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेहमीच विक्रमी संख्येने मतदान होते. या पोटनिवडणुकीमध्ये देखील विक्रमी संख्येने मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!