कोल्हापूर • प्रतिनिधी
साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शनिवारी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा उत्साहात संपन्न झाली. परीक्षेसाठी बारावी विज्ञान शाखेतील राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड तसेच कोल्हापूर शहरातील ४४ महविद्यालायमधून १५२८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
गेल्या चार वर्षांपासून संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जात आहे. शनिवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व काळजी घेऊन ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याच्या सुविधेसोबत अल्पोपहारसुद्धा पुरवण्यात आला.
या परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर होणाऱ्या MHT-CET क्रॅश कोर्सला सहभाग नोंदवण्यासाठी सुलभ होणार आहे. बारावी बोर्ड व CET व JEE परीक्षेसाठीसुद्धा या परीक्षेचा अनुभव उपयुक्त असेल.
परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना पेपर नंतर IIT च्या तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स यावेळी देण्यात आल्या. परीक्षेतील प्रश्नांमधील विविधता, परीक्षेची काठीण्यपातळी व परीक्षेचा आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ज्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली नव्हती अशा विद्यार्थ्यांना परीक्षेदिवशी महाविद्यालयामध्ये थेट नावनोंदणी करण्याची सुविधा करण्यात आली.
या परीक्षेच्या उत्तम।नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, ॲडमिशन प्रमुख, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
——————————————————-