राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत पीडीजेएला पुरूष गटाचे विजेतेपद; कोल्हापूरला उपविजेतेपद

Spread the love


• विकास देसाई, हर्षल थिटे, अंकित सोनावणे यांना सुवर्ण
कोल्हापूर • प्रतिनिधी
      पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशन पुरूष संघाने (पीडीजेए) तीन सुवर्ण व दोन कांस्यपदके जिंकून ४८ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट (पुरुष व महिला) ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत पुरूष गटात विजेतेपद जिंकले. कोल्हापूर संघाला १ सुवर्ण, १ रौप्य व दोन कांस्यपदके मिळवून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
      पीडीजेएच्या विकास देसाई, हर्षल थिटे, अंकित सोनावणे यांनी निर्विवाद खेळी करीत सुवर्णपदके जिंकली. पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र पोलिस संघाने १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक संपादन केले. 
      महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू  असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या ८१ ते ९० किलो गटात पीडीजेएच्या विकास देसाईने साताराच्या ऋषिराज भोसलेचा हाराई गोशीने सुरूवात करून ओसोतो गारी या डावावर पूर्ण गुण संपादन करून विजय मिळवित सुवर्ण पदक जिंकले. या वजन गटात अहमदनगरच्या सतिश शिंदेने कोल्हापूरच्या हर्षवर्धन देसाईचा तर पुणे ज्युदो असोसिएशनच्या रोहित कोळीने ठाण्याच्या अक्षय नाईकला पराभूत करून कास्य पदक जिंकली.
      ७३ ते ८१ किलो गटात पीडीजेएच्या हर्षल थिटेने ठाण्याच्या अक्षय गदादेला चोक देऊन विजय संपादन केला. कास्यपदकाच्या लढतीत सोलापूरच्या प्रदिप गायकवाडने सांगलीच्या प्रणव पाटीलला तर महाराष्ट्र   पोलिसच्या सुमित भूतेने कोल्हापूरच्या सौरव सुतारला नमविले. 
      ६६ ते ७३ किलो वजन गटात पीडिजेएच्या अंकित सोनावणेने ठाण्याच्या अनिष हेगडेला ओसोतो गारी व सोदेत सुरू कोमी गोशी या डावाचा उपयोग करून पूर्ण गुणाने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. कास्यपदकाच्या लढतीत पुणे ज्युदो असोसिएशनच्या अमर बोराटेने महाराष्ट्र पोलिसच्या राम अडसूळचा तर विजय खोतने नाशिकच्या सुहास मैन्दचा पराभव केला.
                           स्पर्धेचा निकाल….. 
• ६० किलो खालील गट- सुवर्ण : रणविरसिंह भोसले (कोल्हापूर), रौप्य : श्रवण शेडगे (पीजेए), कांस्य : रोहित भाडगे  (धुळे) वि. वि. ऋतिक पांडे (ठाणे) व प्रणित गोडसे (क्रीडा प्रबोधिनी) वि. वि. प्रथम गुरव (मुंबई).
• ६६ ते ७३ किलो गट- सुवर्ण : अंकित सोनावणे (पीडीजेए), रौप्य : अनिष हेगडे (ठाणे), कांस्य : अमर बोराटे  (पीजेए) वि. वि. राम अडसूळ (महाराष्ट्र पालिस) व विजय खोत (कोल्हापूर) वि. वि. सुहास मैन्द (नाशिक).
• ७३ ते ८१ किलो गट- सुवर्ण : हर्षल थिटे (पीडीजेए), रौप्य : अक्षय गदादे (ठाणे), कास्य : प्रदिप गायकवाड (सोलापूर) वि. वि. प्रणव पाटील (सांगली) व सुमित भूते (महाराष्ट्र पोलिस) वि. वि. सौरव सुतार (कोेल्हापूर).
• ८१ ते ९० किलो गट- सुवर्ण : विकास देसाई (पीडीजेए), रौप्य : ऋषिराज भोसले (सातारा), कास्य : सतिश शिंदे (अहमदनगर) वि.वि. हर्षवर्धन देसाई (कोल्हापूर) व रोहित कोळी (पीजेए) वि. वि. अक्षय नाईक (ठाणे);   
• ९० ते १०० किलो गट- सुवर्ण : मनोज राऊत ( महाराष्ट्र पोलिस), रौप्य : सार्थक कांबळे (ठाणे), कास्य : ऋषिकेश बोमाणे (लातूर) वि. वि. व्यंकटेश घाडी (पिडीजेए) व गणेश लांडगे (अहमदनगर) वि. वि. सुधीर काटकर (औरंगाबाद).
• १०० किलो वरील गट- सुवर्ण : सागर कोल्हे (अहमदनगर), रौप्य : रोहित कदम (महाराष्ट्र पोलिस), कास्य : विक्रांत इंगवले (पीडीजेए) वि. वि. मनवर्धन पाटील (ठाणे) व आदित्य पाटील (कोल्हापूर) वि. वि. बिनहिलाभी (औरंगाबाद). 
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!