विनामास्क व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल दंड

Spread the love

• ५५ नागरिकांच्याकडून २८ हजार ५००रू. दंड वसूल
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५३ नागरिकांकडून २६ हजार ५०० व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २ नागरिकांकडून २००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या सात भरारी पथकामार्फत शहरात कारवाई करुन ५५ नागरिकांच्याकडून २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
     सदरची कारवाई शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मीपुरी परिसर, गंगावेश, रंकाळावेश, उतरेश्वर, लक्षतीर्थ वसाहत, महाद्वार रोड, शिवाजी पेठ, फुलेवाडी, नाना पाटीलनगर, जरगनगर, रायगड कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, खासबाग, जवाहरनगर, उद्यमनगर, प्रतिभानगर, शाहूनगर, राजारामपुरी परिसर, शाहूपुरी परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, राजेन्द्रनगर, सायबर चौक, मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, कदमवाडी, सदर बाजार, कसबा बावडा, लाईन बाजार, ताराबाई  पार्क, नागाळा पार्क, एसटीस्टॅण्ड परिसर, रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.  
     अग्निशमन विभागाच्यावतीने शहरातील मंगल कार्यालय, लॉन, मोठी दुकाने येथे दैनंदिन तपासणी करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या पथकामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच केएमटीमधील प्रवाशांची दोन डोस पुर्ण असल्याची तपासणी करण्यात येत आहे. शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्क व सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!