जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम जनतेने केलं: मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जीव ओवाळून टाकावा एवढं प्रचंड प्रेम जनतेने आपल्यावर केलं आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्यापेक्षा सातजन्मी जनतेच्या ऋणात राहणेच पसंत करीन, असेही ते म्हणाले.
     कागल येथे शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये ७०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व ओळखपत्र वाटप कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी होते.
     मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, याआधी कामगार मंत्री असताना आपण बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाकडे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण करण्यासाठीचा हा न आटणारा समुद्र आहे, असेही ते म्हणाले. लवकरच शेतमजुरांसह रिक्षाचालक, ट्रकचालक, टेम्पोचालक, एसटीचालक तसेच यंत्रमाग कामगारांचेही कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याचे सांगतानाच ते पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहेत.
                   आयुष्यभर हमाली करणार…..
     मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सेवेतून सत्ता मिळाल्यामुळे मंत्रिपदाच्या प्रत्येक खात्यात गरीब माणूस शोधला. जनतेनेही मला भरभरून दिले आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतूनच गोरगरीब जनतेची हमाली आयुष्यभर करणार.
      अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी म्हणाले, राजसत्ता ही गोरगरिबांच्या कल्याणासाठी कशी राबवायची, याचा परिपाठच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घालून दिलेला आहे. त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या प्रत्येक खात्यात त्यांनी सामान्य माणूस शोधला व त्याचा सर्वांगीण विकास केला.         
      यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर वअतुल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.   
      व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नगरसेवक आनंदराव पसारे, नूतन गाडेकर, नितीन दिंडे, सौ. मंगल गुरव, सौ. जयश्री शेवडे, सौ. माधवी मोरबाळे यांच्यासह संजय चितारी, महेश गाडेकर, सौ. संगीता गाडेकर, शहनाज आत्ता, सौ. बेबीताई घाटगे, ॲड. संग्राम गुरव, बाबासो नाईक, शिरीष बारवाडे, रंजना सनगर, बेबीताई गाडेकर, पद्मजा भालबर, भारत मोरे, गंगाराम शेवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
      स्वागत प्रवीण सोनुले यांनी तर प्रास्ताविक संतोष रजपूत यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार भिकाजी देवकर यांनी मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!