स्टार लोकलमार्टच्या माध्यमातून लोकांना मिळणार रोजगार: श्रेणीक घोडावत

• २०२५ पर्यंत २५०००हून अधिक लोकांना मिळणार रोजगार
कोल्हापूर • प्रतिनिधी
      स्टार लोकलमार्ट सुरू करून आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात ग्राहकांकडून मिळालेल्या पसंतीमुळे इस्लामपूर आणि कोल्हापूर येथे नव्याने अनुक्रमे २४ व २५ व्या लोकलमार्टचे दिमाखात उदघाटन करण्यात आले. या उदघाटनप्रसंगी ग्रुपचे चेअरमन उद्योगपती संजय घोडावत आणि घोडावत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत उपस्थित होते.
     यावेळी बोलताना श्रेणिक घोडावत म्हणाले, “एवढ्या कमी कालावधीत एवढी अतुलनीय कामगिरी केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांचे, फ्रँचायझींचे आणि कर्मचार्‍यांचे अतूट समर्थन आणि विश्वासाबद्दल आभारी आहोत. भविष्यात स्टार लोकलमार्टचा आम्ही विस्तार करून येणाऱ्या काही वर्षांमध्ये ३०००हून अधिक स्टोअर्ससह २५००० रोजगार संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
      स्टार लोकलमार्टने अल्पावधीतच आपल्या पुरवठा, उत्तम नियोजन व व्यवस्थापनाच्या जोरावर स्थानिक पातळीवर ग्राहकांचा विश्वास प्राप्त करीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या फ्रँचायझी मॉडेलच्या अभिनव कल्पनेला नवद्योजकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
     स्टार लोकलमार्ट हा संजय घोडावत ग्रुपचा एक यशस्वी प्रकल्प असून त्यांनी लोकल मार्केटमध्ये आपली उद्यमशीलता जपत चांगल्या गुणवत्तापूर्ण दर्जाचा माल आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यांचे एक रोल मॉडेल सर्वांपुढे उभे केले आहे.  
                   संजय घोडावत ग्रुपबद्दल…….
     एसजीजी हा एव्हिएशन(स्टार एअर), कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, एज्युकेशन (संजय घोडावत युनिव्हर्सिटी), एनर्जी, मायनिंग, रिअल्टी, रिटेल (स्टार लोकलमार्ट), सॉफ्टवेअर आणि टेक्सटाईल अशा काही प्रमुख व्यवसायिक क्षेत्रांमध्ये आपली सेवा व उत्पादने देणारा भारतातील प्रमुख व्यवसाय समूहांपैकी एक उद्योग समूह आहे. एसजी लर्निंग अँपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेईई व सीईटीच्या तयारीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात. १९९३ पासून एसजीजीचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय घोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीची उत्तरोत्तर वाढ होत आहे. आज संजय घोडावत विद्यापीठामध्ये १६०००हून अधिक विद्यार्थी आपले भविष्य घडवीत आहेत आणि संजय घोडावत ग्रुपने १००००हून अधिक लोकांना रोजगार पुरविला आहे. भारतभरातील लाखो ग्राहकांचा मजबूत आधार असलेला हा उद्योग समूह जोमाने पुढे जात आहे.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *