खासगी विद्यापीठांतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा सीईटी परीक्षा १६ जुलैपासून ऑनलाईन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी – २०२१ ही परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम तारीख आहे. या परीक्षेचा निकाल २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे सदस्य असलेल्या संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
     याविषयी विनायक भोसले म्हणाले, यावर्षी कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी यंदा इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश सीईटीद्वारे देण्यात येणार आहे. शासनाच्या सीईटी परीक्षा व्यतिरिक्त खाजगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारेही विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो, म्हणून पेरा इंडिया या खासगी विद्यापीठांच्या संघटनेने ही सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल.
      खासगी विद्यापीठांच्या संघटनेद्वारे १६ ते १८ जुलै दरम्यान होणाऱ्या ‘पेरा’ सीईटीच्या आधारे राज्यातील विद्यार्थ्यांना १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना घरात बसूनच ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ही विश्वस्त विनायक भोसले यांनी केले.
                            ——-
     संजय घोडावत विद्यापीठ हे पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विद्यापीठ असून येथे लिबरल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, फार्मसी, कॉम्प्युटर अप्लिकेशन या विभागांतर्गत अभ्यासक्रम सुरु आहेत व यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंत पदवी धारण करण्याची संधी उपलब्ध आहे. तरी या विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या सीईटीसह पेरा सीईटीमधून देखील प्रवेश दिले जाणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!