परवाना नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाचा प्रादुर्भाव व ब्रेक द चेनची मुदतवाढ झाल्याने शहरातील दुकानदारांचे परवाना नुतनीकरणासाठी ३० जून २०२१अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
     सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये आपले परवाने नुतनीकरण करण्याबाबत महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने दि. २५ मार्च २०२१ चे जाहीर प्रसिध्दीकरणाव्दारे कळविण्यात आलेले होते. सध्या राज्यात व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व महाराष्ट्र शासनाने १५ मे २०२१ अखेर ब्रेक द चेनची मुदत वाढवल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी परवाने नुतनीकरण करण्याकरिता दि.३० जून २०२१अखेर दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.
     या कालावधीत कोणतीही लेट फी आकारली जाणार नाही. ज्या व्यवसायिकांना अग्निशमन सुरक्षितेच्यादृष्टीने बी फार्म सादर करणे आवश्यक आहे, त्यांनी सदरचा फॉर्म अर्जासोबत सादर करुन परवाना नुतनीकरण करण्याचा आहे. महापालिकेची परवाना फि भरणेची वेळ सुट्टीचे दिवस वगळून सकाळी १० ते १:३० व दुपारी २ ते ३:३० पर्यंत राहील. सदरची फी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र (शिवाजी मार्केट) तळमजला या ठिकाणी भरुन घेण्यात येईल. तरी याची शहरातील सर्व परवानाधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन परवाना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!