कोल्हापूर • प्रतिनिधी
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद प्रशिक्षण आणि शिक्षण अटल या प्रकल्पांतर्गत भारतातील फार्मसी व अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक्स्प्लोरिंग फार्म कायनेटिक विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड काटम
कम्प्युटिंग या विषयावर आधारित कार्यक्रम दि २ ते ६ नोव्हेंबरपर्यंत आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन २ नोवेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अटल अकादमीमार्फत आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम , प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे व उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांच्या उपस्थित होईल.
सदर कार्यक्रम पाच दिवस चालणार असून या कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे २०० शिक्षक व संशोधक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत मुरूमकर, डॉ. कुंदन इंगळे, डॉ. भाऊसाहेब पाटील, डॉ. पूजा जैन, डॉ. संतोष पाटील, डॉ. सुवर्ण राय, डॉ.अजय पिलाई, डॉ. गणेश, डॉ. स्वामी उपाध्ये, डॉ.अनिल देशपांडे, डॉ. एस. आर. पिसुरलैनकर , सचिन जगताप, डॉ. सुभाष राजमाने तसेच डॉ. वंदना पत्रावळी यासारखे देशातील नामवंत संशोधक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कौशल्य विकास कार्यक्रमाचे डॉ. एम. एस. भाटीया या मुख्य समन्वयक व प्रा. व्ही. टी. पवार हे सहसमन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.शिवाजी विद्यापीठ अंतर्गत फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी केलै आहे.