घोडावत विद्यापीठामध्ये फार्मसी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय कार्यशाळा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मसी अधिविभागामार्फत ”औषधनिर्मिती आणि जीवविज्ञानातील संशोधनाच्या पद्धती” या विषयावर दोनदिवसीय ऑनलाईन पद्धतीने नुकतीच आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.
      याआधी झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या अभिप्रायावरून विद्यार्थी व शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या औषधनिर्मिती आणि जीवविज्ञानातील संशोधनाच्या पद्धती याची माहिती मिळावी या उद्देशाने हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेस देशविदेशातील १००० हुन अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
     या कार्यशाळेबद्दल बोलताना स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. शिरीषकुमार आंबवडे म्हणाले की, ”संशोधनाला उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी त्याच पद्धतीचे ज्ञान व तंत्रज्ञान माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे. या माहितीमुळेच संशोधनाची ओढ उपजत जोपासली जाऊ शकते. यासाठी अशा कार्यशाळेचे खूप महत्व आहे.”
       कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. एम. टी. तेलसंग यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यशाळेस ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. दिपक डुबल, आयसीटीच्या प्रा. डॉ. वंदना पत्रावळे, इजिप्तच्या फ्युचर युनिव्हर्सिटीच्या प्रा. डॉ. डोआ हमेद युसूफ, डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे च्या रिसर्च सेंटरचे संचालक शास्त्रज्ञ डॉ.चंद्रशेखर राऊत व  डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विश्वजित खोत, मॅकलॉइड फार्मचे शास्त्रज्ञ महेश बोथरे, एसजीयुचे प्रा.डॉ. विश्वजित घोरपडे हे प्रमुख मार्गदर्शक  लाभले होते.
      तसेच विद्यार्थी चर्चासत्रामध्ये प्रमुख तज्ज्ञ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ॲडलंड विद्यापीठाचे सौरभ पिसे व इराणच्या कषाण विद्यापीठाच्या मासुमेय नजराबी हे लाभले.
      कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शिरीषकुमार आंबवडे, डॉ. विश्वजीत घोरपडे, डॉ. अभिनंदन पाटील, प्रा. सोनाली निरंकारी, प्रा.भाग्यश्री घाटे, प्रा.संगीता संकपाळ, प्रा.स्नेहा रोचलानी, तुकाराम जंगम व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
      या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी  अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *