३२व्या राज्य फेन्सिंग स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात; शनिवारी स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

• राज्यभरातील सुमारे ५०० खेळाडूंचा सहभाग
कोल्हापूर • प्रतिनिधी
     ३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्त्याखाली कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
      शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. इपी, फॉईल व सेंबर या तीन प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव उदय डोंगरे, सल्लागार अशोक दुधारे, खजिनदार राजकुमार सोमवंशी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
      संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यानी गुरुवारी सायंकाळी स्पर्धा तयारीचा आढावा घेतला. यावेळी डॉ. पी. टी. गायकवाड, संजय जाधव, विनय जाधव, डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. राम पवार, विनोद पंडित, डी. डी. पाटील, गजानन बेडेकर, एस. एच. पाटील, संदीप जाधव, विनायक सूर्यवंशी, प्रदीप धुमाळ, शिवाजी पाटील, संभाजी मिरजे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
       कोल्हापुरात कोरोना कालावधीनंतर प्रथमच राज्यस्तरवरील मोठ्या स्पर्धेचे आयोजन होत आहे. आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून सर्व कोल्हापुरकरांच्या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव व कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव विनय जाधव यांनी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!