संजय घोडावत शिक्षण संकुलात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     वैश्‍विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल व सध्या कोरोनाच्या कठीण समयी लागणारा ऑक्सिजन याचा गांभीर्याने विचार करून भावी पिढी सुस्थितीत जीवन जगावी या दूरदृष्टिकोनातून संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
     यावेळी बोलताना विनायक भोसले म्हणाले ” सध्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. प्रत्येक व्यक्तीने एक – एक वृक्ष रोपण करून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे तसेच या उपक्रमामुळे ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या कमी होण्यास मदत होईल. वनश्री संजय घोडावत हे नेहमीच अशा समाजपयोगी उपक्रमात पुढाकार घेत असतात. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करून ती जगवली आहेत.”
      हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय बी. कोंगे आणि विजय देसाई व टीमने अथक परिश्रम घेतले.
      यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, प्राचार्य विराट गिरी, स्कुल ऑफ लिबरल आर्टचे डीन डॉ. उत्तम जाधव, मेकॅनिकल इंजिनीरिंगचे विभागप्रमुख डॉ. यु. सी. कपाले, डॉ. अभिजित पाटील, प्रा. संदीप वाटेगावकर यांनीही वृक्षारोपण केले.
या उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी सर्वांचे कौतुक केले. 
——————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!