राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महापालिकेत प्रतिज्ञा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन महापालिकेच्या मुख्य चौकामध्ये गर्दी न करता ज्या त्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रतिज्ञा घेण्यात आली.
     यावेळी सर्वांनी “आम्ही, भारताचे नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपती व शांततपूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी प्रतिज्ञा घेतली.
     यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संदीप घार्गे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, नगरसचिव सुनिल बिद्रे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!