० ते १ वर्षाच्या आतील बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन लसीकरण


कोल्हापूर • प्रतिनिधी
     न्युमोनिया, मेंदूज्वर आणि सेप्टी सेमिया या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
     लहान मुलांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा समावेश केला आहे. जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बाहय संपर्क वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदक हर्षदा, जिल्हा माता संगोपन अधिकारी फारुख देसाई यांच्या उपस्थितीत सानेगुरुजी वसाहत येथील बीडी कामगार चाळ येथील अंगणवाडी क्र.११५ येथे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
     कोरोना कालावधीत आरोग्य विभागा अत्यंत चांगली कामगिरी करीत आहे. आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाद्वारे आपल्या लहान बालकांचे न्यूमोनियापासून संरक्षण होणार असल्याने आपल्या ० ते १ वर्षाच्या आतील बालकांना नियोजित वेळेनुसार ही लस आवश्यक दयावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
     प्रारंभी लसीकरण अधिकारी डॉ.रुपाली यादव यांनी प्रस्ताविक करुन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दिप प्रज्वलन करुन या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
     मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले हे लसीकरण नव्याने चालू होत आहे. ० ते १ वर्षाच्या आतील बालकांना पालकांनी ही लस दयावी. यामध्ये पहिला डोस दिड महिन्यामध्ये, दुसरा डोस साडेतीन महिमध्ये व तिसरा डोस ९ व्या महिन्यात बुस्टर डोस म्हणून दिला जाणार असल्याचे सांगितले.
       जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नियमीत लसीकरणामध्ये या व्हॅक्सीनचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे. शासन निर्देशाप्रमाणे हे लसीकरण राबविण्यात येणार आहे. ही लस महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये विनामुल्य उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या लसीरणाचा जास्तीजास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
     यावेळी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, बालरोग तज्ञ डॉ. विश्वजीत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल माने, फुलेवाडी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल नाळे व केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *