कोल्हापूर • प्रतिनिधी
शिरोळ येथील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी चंद्रकांत शिरगावे यांचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार झाला. इचलकरंजी येथे श्री. आवाडे यांच्या घरी पोलीस उपनिरीक्षक शिरगावे यांचा हा सन्मान झाला.
पोलीस उपनिरीक्षकपदाच्या प्रशिक्षणकाळात शुभांगी शिरगावे यांनी एकूण १८ पैकी ११ अवॉर्ड मिळविली आहेत. त्यामुळेच त्यांना पोलीस दलाचा “बेस्ट कॅडेट – रिव्हॉल्वर ऑफ ऑनर” हा मानाचा सन्मान मिळाला. त्यांच्या उत्तुंग यशाबद्दल हा गौरव झाला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी यांच्या यशाचे अनुकरण मुलींनी करावे.
पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी शिरगावे यांच्यासारख्या कर्तबगार महिला अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची शान निश्चितच वाढेल.
यावेळी राहुल आवाडे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे, प्रकाश सातपुते, नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरे, नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, अमित गाताडे, बाळासो कलागते, शशांक बावचकर, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील आदी उपस्थित होते.
———————————————–