कचरा घोटाळाप्रश्नी कारवाई टाळणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळास टाळे लावणार: भाजपचा इशारा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      पंधरा दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतरही महानगरपालिकेला कचरा घोटाळाप्रश्नी साधी नोटीस न दिलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन दिवसात महानगरपालिकेवर कारवाई केली नाही, तर गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे लावू,  असा इशारा भाजपने दिला आहे.
       भाजपाच्या कसबा बावड्यातील कार्यकर्त्यांनी १५ दिवसापूर्वी, महानगरपालिकेत वर्षानुवर्षे साचलेला लाखो टन कचरा कोणतीही प्रक्रिया न करता बावडा परिसरातील काही शेतात टाकल्याचे उघडकीस आणले होते. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड ऑफिसर अर्जुन जाधव यांनी प्रत्यक्ष जागेवर फिरती करून पंचनामा केला होता व त्या पंचनाम्यामध्ये ‘सदर ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेने अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न करता कचरा टाकल्याचे दिसून आले’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर पुढे कोणतीच कारवाई न केल्याचे आज भाजपाचे उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे व प्रदीप उलपे यांना प्रदूषण नियंत्रण मंडळात कळले. त्यामुळे जर तुम्ही कोणतेच काम करत नसाल तर या कार्यालयाची आवश्यकताच काय असा सवाल त्यांनी अधिकार्‍यांना केला आणि दोन दिवसात पुढील कारवाई न झाल्यास गुरुवारी कार्यालयास टाळे लावू, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!