कोल्हापूर • प्रतिनिधी
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची मकर संक्रांतीला तिळगुळाच्या अर्थात हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा अविनाश गजानन मुनीश्वर यांनी बांधली.
मकर संक्रांतीच्या दिवशी साकारण्यात आलेल्या श्री अंबाबाईच्या सालंकृत पूजेमध्ये खास हलव्यांपासून बनविलेले दागिने वापरण्यात आले. सात पदरी कंठीहार, पुतळ्याची माळ, हार, बाजूबंद, चींचपेटी, ठुशी, मयूरकुंडले असे विविध पर्यावरणपूरक हलव्याचे तयार केलेले दागिने वापरण्यात आले.
———————————————–