‘पोरगं मजेतय’ प्रदर्शनासाठी सज्ज


कोल्हापूर • प्रतिनिधी
      आपल्या मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय दिग्दर्शक मकरंद माने यांनी ‘रिंगण’, ‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून आजवर मराठी रुपेरी पडद्यावर आणले. उत्तम कथाविषय आणि तितकेच उत्तम कलाकार-तंत्रज्ञ यांची सांगड घालून मकरंद माने पुन्हा एका नव्या कलाकृतीसह सज्ज झाले आहेत. नाईंटीनाईन प्रोडक्शन्स आणि बहुरूपी प्रोडक्शन्स यांची निर्मिती असलेला ‘पोरगं मजेतय’ हा त्यांचा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
     ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मधील मराठी चित्रपट विभागामध्ये या चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
     मानवी भावभावना, नातेसंबंध याविषयीच्या कुतूहलातून त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांना अधोरेखित करणारे अनेक चित्रपट आजवर रुपेरी पडद्यावर आले आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून साधला आहे.
      ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. प्रोडक्शन हेड मंगेश जगताप आहेत. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत.
———————————————–

  Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *