पोल्ट्रीची भिंत पडून तिघेजण ठार

• गडहिंग्लजमधील मौजे मुगळी येथील घटना
कोल्हापूर • प्रतिनिधी
      मौजे मुगळी (ता.गडहिंग्लज) येथे आज दुपारी पोल्ट्रीची भिंत पडून तिघेजण ठार झाले. मयतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
      दरम्यान, अजित अर्जुन कांबळे (वय ४८), गिरीजा संदीप कांबळे (वय ४५), संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५,  सर्व रा. नांगनूर, ता. गडहिंग्लज) अशी या दुर्घटनेत मयत झालेल्यांची नावे आहेत.
      अजित कांबळे हे बहिण गिरीजा कांबळे व भावाची पत्नी संगीता कांबळे यांच्यासह आपल्या नांगनूर या गावी परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी पडत असलेल्या पावसापासून बचावासाठी त्यांनी मौजे मुगळीजवळ असलेल्या नूल मार्गावरील भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी पावसासह जोरदार वारे सुरू झाले. वादळाच्या वेगाने अचानक पोल्ट्रीची भिंत पडून तिघेही त्याखाली गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा गडहिंग्लज पोलिस अधिक तपास करत आहेत.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *