मुरगुड येथील विद्यार्थ्यांना महावितरणकडून वीज बचतीचे धडे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूरच्या मुरगुड उपविभागाकडून बोटे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये विजेचा वापर काटकसरीने कसा करावा, याविषयी उपविभागीय अभियंता हेमंत येडगे यांनी मार्गदर्शन केले.
      सध्याच्या विजेच्या वाढत्या मागणीमुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या परिस्थितीत महावितरणने वीज ग्राहकांना सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते १० या विजेच्या शिखर मागणी वेळेत काटकसरीने वीज वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना वीज बचतीचे महत्व पटवून देत वीज बचत कशी करावी या विषयी मार्गदर्शन करण्यात येते आहे. बोटे कॉलेज व्यवस्थापनाने महावितरणचे आभार मानले.   

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!