मावळा संचलित कोविड केंद्राला पीपीई किट्स, फेसशील्ड व मास्क प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     माजी परिवहन समिती सभापती राजू पसारे, डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे अधिष्ठाता डॉ.अमरसिंह जाधव व रिलायन्स वरिष्ठ व्यवस्थापक  सत्यजित भोसले यांच्या सौजन्याने व सहकार्याने मावळा कोल्हापूर संचलित कोविड केंद्रासाठी पीपीई किट्स, फेसशील्ड व मास्क प्रदान करण्यात आले.
      डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे साहित्य कोविड केंद्रामधील रूग्ण व वैद्यकीय टीमसाठी देण्यात आले. हे कोविड केंद्र सध्या शहाजी महाविद्यालय येथे सुरू असून येथे ५० हून जास्त रुग्ण अलागिकरणामध्ये उपचार घेत आहेत. या केंद्रासाठी १५० पीपीई किटस व पाचशेहून जास्त मास्क, फेसशील्ड देण्यात आले.
      यावेळी राजू पसारे, डॉ.अमरसिंह जाधव, सत्यजित भोसले, मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार, अभिजीत भोसले, सागर भुसारी, रमाकांत बिरंजे, संतोष हेबाली, राजू गुप्ता, मनोज गवळी, प्रतापसिंह जाधव, गौरव पसारे, आप्पा चव्हाण, आतिश गावडे उपस्थित होते.
———————————

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!