प्रकाश पोवार यांचा शिक्षक सेवाकाळ आदर्शवत: डॉ. संजय डी. पाटील


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप संचलित कसबा बावडा शिक्षण मंडळाच्या श्री गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पोवार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. आपल्या २२ वर्षाच्या सेवाकालात एकही रजा ना घेता प्रत्येक दिवस शाळा व विद्यार्थ्यांसाठी देणारे शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. त्यांचा शिक्षक सेवाकाळ इतरांसाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी काढले.
    मंगळवारी (दि.७) डॉ. डी. वाय. पाटील संकुल येथे संपर्क अधिकारी डॉ. विश्वनाथ भोसले व संजय जाधव यांच्या हस्ते प्रकाश पोवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने पोवार यांना शुभेच्छा दिल्या. पोवार यांच्या निवृतीमुळे रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर सौ. भारती बंडू धस यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे.
     यावेळी छत्रपती राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.के. कांबळे, कै.यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. हिरूगडे, कै. यशवंतराव भाऊराव पाटील हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. गौतमी पाटील, मास्टर दीनानाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक केसरकर, श्री गणेश विद्यालयच्या नूतन मुख्याध्यापिका सौ. भारती बंडू धस, सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. 
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *