प्रणव काटकर यांना पीएच.डी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीज’चे विद्यार्थी प्रणव कालिदास काटकर यांना  विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे.
      प्रणव काटकर यांनी फिजिक्स विद्याशाखेतून ‘केमिकल सिंथेसिस ऑफ कोबाल्ट मॅग्नीज फॉस्फेट थीन फिल्म फॉर सुपरकॅपॅसीटर अॅप्लिकेशन’ या विषयावरील शोधनिबंध सादर केला होता. काटकर हे सातारा जिल्ह्यातील नरवणे- माण येथील असून त्यांना डॉ. यु. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
      प्रणव काटकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे  कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. व्ही. लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *