महापालिकेत मान्सूनपुर्व आढावा बैठक संपन्न

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      यावर्षी मान्सून लवकर सक्रीय होण्याची शक्यता असल्याने मान्सूनपुर्व तयारीचा आढावा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
      मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी पथकामार्फत शहरातील १० प्रभागातील नाले सफाईचे काम पुर्ण झाले आहे. नालेसफाईचे उर्वरीत काम ३१ मे २०२१ अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. शहरातील मोठया ५ नाल्यांच्या सफाईसाठी पोकलॅन्ड व लहान नाले सफाईसाठी जेसीबी मशिन भाडयाने घेण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले.
      शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शहरातील धोकादायक इमारतीबाबत दरवर्षीप्रमाणे १५ एप्रिल पर्यंत महानगरपालिकेमार्फत जाहीर प्रसिध्दीकरण केले जात आहे. धोकादायक इमारतीबाबत संबंधितांनी स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेऊन तसे सर्टिफिकेट महानगरपालिकेकडे सादर करावयाचे असलेचे सांगितले. त्याप्रमाणे रस्त्यावरील खड्डे मुजविणे, पॅचवर्क करणे इ. कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
      उप जल अभियंता (प्रकल्प) हर्षजीत घाटगे यांनी नागदेववाडी पंपींग स्टेशन बंद करुन बालिंगा रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे नवीन ३०० एच.पी. चे दोन पंप बसविणे व त्या अनुषंगाने सर्व संलग्न कामे करुन घेणेचे रक्कम रुपये २ कोटी १४ लाखाचे काम मंजूर होवून संबंधित ठेकेदार यांना २६ मार्च २०२१ रोजी वर्कऑर्डर देणेत आलेली आहे. सदरची कामे जून २०२१ पुर्वी पुर्ण करुन घेत असल्याचे सांगितले.
     जल अभियंता नारायण भोसले यांनी २०१९ सालातील आलेला महापूर विचारात घेता नागदेववाडी येथील काम पुर्ण झालेनंतर शहराला ७० टक्के पाणी पुरवठा करु शकतो असे सांगितले.
      मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी अग्निशमन विभागाकडील ठोक मानधनवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सेफ्टी किट उपलब्ध करुन देण्याबाबत सांगितले. पूराची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचण्या अगोदार संभाव्य पूर बाधीत क्षेत्रामध्ये पार्किंग केलेली वाहने हलविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
      अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना मान्सूनसाठी एसओपी तयार करण्याच्या सुचना दिल्या. झुम प्रकल्प येथे डंम्प केलेल्या कचऱ्याच्या ढीगास उन्हाळयामध्ये आग लागू नये यासाठी स्प्रिंकलरद्वारे पाणी मारण्याचे सुरु करण्याच्या सुचना पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांना दिल्या. पूर परिस्थितीपुर्वी पूरबाधीत क्षेत्राचे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे उप-शहर अभियंता यांनी व्हीडीओ शुटींग करुन ठेवणे आवश्यक आहे. पूर आल्यानंतर सदर ठिकाणच्या इमारती, कपौंड वॉल, इले.पोल, इले.लाईन कोठे आहेत हे समजेल व त्यामुळे पुर परिस्थितीमध्ये काम करणे सोयीचे होईल असे सांगितले.  
      प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मान्सुनचे अनुषंगाने जी काही निविदा काढावयाची आहे ती रीतसर कार्यवाही ठेऊन तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
      यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, प्रशासन अधिकारी शंकर यादव , उपशहर अभियंता बाबूराव दबडे, पर्यावरण अधिकारी समिर व्याघ्रांबरे, उपजल अभियंता रामदास गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!