बिल्डो प्रदर्शनात “कोल्हापूर शहर तिसरा विकास आराखडा” विषयावर सादरीकरण

Spread the love

• विकास आराखडा विभागाचे धनंजय खोत यांनी दिली माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार करीत असताना कोल्हापूर शहर हे एक पंचगंगेच्या काठावरील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा स्वरूपाचे शहर आहे याचे भान ठेवून आम्ही कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार करीत आहोत. अशी माहिती धनंजय खोत, उपसंचालक नगर रचना (डी. पी. युनिट) यांनी दिली. बिल्डो २०२२ प्रदर्शनात आयोजित केलेल्या “कोल्हापूर शहर तिसरा विकास आराखडा” या विषयावर बोलत होते.
      नियोजित कोल्हापूर शहर विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले. धनंजय खोत यांच्या सोबत नगर रचना विभागातील अधिकारी रमेश लाड यांनीही सादरीकरणामध्ये सहभाग घेतला.
      तिसरा विकास आराखडा तयार करीत असताना कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणच्या भौगोलिक, नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला जात आहे.  शहराची वाढती लोकसंख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, नगर रचना विभागाचा इतिहास आणि वेळोवेळी झालेला विकास, शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे यांचा विचार केला जात आहे. विकास आराखड्याचे प्रत्यक्ष कामकाज करीत असताना विकास आराखड्याचे २ टप्पे त्यांनी सांगितले आहेत. ते म्हणजे  सध्याचा जमीन वापर आणि प्रस्तावित जमीन वापर. या दोन पातळीवर सविस्तर अभ्यास करून नवीन आराखडा तयार केला जात आहे.
नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे अंमलही केला जाईल याचीही त्यांनी हमी दिली. सादरीकरण झाल्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना धनंजय खोत यांनी उत्तरे दिली.
       विकास आराखडा साकारत असताना असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्, इंजिनिअर्सचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी धनंजय खोत आणि रमेश लाड यांचा सत्कार करून प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी स्वागत व आभार मानले. 
       बिल्डो २०२२ प्रदर्शनस्थळावर उद्या रविवारी (दि.६) सायंकाळी ५:३० वाजता आयकॉन स्टीलचे टेक्निकल प्रॉडक्शन हेड राजेंद्र त्रिपाठी यांचे प्रेझेंटेशन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!